We wander therefore we are ... We wonder!

KolkataSundarban

सुंदरा मनामध्ये भरली!

सुंदरबन ... गंगेचा त्रिभुज प्रदेश. बेटं आणि त्याला वेढणा-या मोहिनी, पद्मा अशा सुंदर नावाच्या गंगेच्या शाखा-प्रशाखा. कधी अगदी छोटी बोट जाईल इतकया चिंचोळ्या तर कधी दृष्टीत मावणार नाही इतक्या विस्तिर्ण.

दलदलीची, गाळाची बनलेली बेटं - सुधन्याखाली, ... त्यावर मुख्यत: उगवलेले मॅनग्रोव्स. मॅन्ग्रोव ही दलदलीत उगवणारी आणि तिला धरुन ठेवणारी झुडपं असतात. ह्यांची हानी झाली तर किना-यांची धुप होते. त्सुनामीने होणारे नुकसान वाढते. तर ह्या मॅनग्रोव्सना बंगालात सुंदरी गाछ म्हणतात. आणि ह्या संदरींचं बन ते सुंदरबन.

ह्यावेळी बंगालवारीत, सुंदरबनात सफर करायचा योग आला. बेटातुन वाट काढणारी लॉंच. सुंदरीची झाडं, बगळे, वाहतं पाणी आणि निरव शांतता. वेगळाच अनुभव होता.

सुंदरबनाचा खरा राजा बाघ मोशाय! बेंगाल टायगर!त्याला हेतल गाछ ह्या गवतात रहायला आवडतं.

आम्ही प्रयत्न केला पण त्यानं काय अप्वाईंटमेंट नाही दिली बुवा. नुसतीच हुलकावणी दिली. पण त्याच्या इतर मानक-यांनी मात्र दर्शन दिले.



सुंदरबनात, एका गरीब मुलाची, त्याला दखिनराय या वाघातोंडी देणा-या त्याच्या काकाची आणि त्याला वाचवणा-या बनबिबीची आख्याईका आहे. सुधन्याखालीत त्यांचे मंदिर आहे.

अवघा निसर्ग कसा काहीतरी गुढ आणि आदिम गवसल्यासारखा अंतर्मुख आणि स्तब्ध! येताना थोडासा सुकुन हम भी ले आये!

No comments:

| Designed by Colorlib