We wander therefore we are ... We wonder!

IndiaKolkataMarathi

शोनार कोलकाटा

मला बंगाली लोकांचा भाषिक exuberance खरंच आवडतो. किती छान नावं असतात - गावांची बिजोया (विजया), ठिकाणांची राजारहाट (राजाचा बाजार), बौबाजार. माणसांची - शोब्याशाचि ( सव्यसाची) मोनिकोंगोना (मणिकंगणा), पदार्थांची - शोंदेश, रोशकोदम आणि साखरभाताचं नाव सीताभोग - उफ़्फ़ नावं वाचुनच कसं सांस्कृतिक उन्नयन झाल्यासारखं वाटतं! आणि या सर्वांचं त्या नावांनी फार ’उन्नयन’ होवु नये (थोडक्यात चढुन जाउ नये) म्हणुन तत्परतेने त्याना टुटुल, भेबला, सारखी डाक नामे ठेवण्यात येतात. काही गावांची नावं ही त्यांची डाक नामे असावीत असे वाटते उदा. बजबज ( हो ह्या नावाचं खरेच गाव आहे - आणि तिथे बजबजपुरी माजलेली नाही), डमडम.
पुण्याप्रमाणे कलकत्त्यात मी पाट्या वाचायाचा उद्योग चालु ठेवला. ही तिसरी ट्रीप असल्याने बंगाली बरी वाचता येत होती. शिवाय इंग्रजी sub titles मिळाल्या तर अजुन उत्तम. पार ममता दीदीच्या "मा माटी मानुष" पासुन अनुपम वस्त्रसंभार पर्यंत बरेच कायकाय जुळवुन वाचले.
अफाट पार पोट बिघडेपर्यंत खादाडी केली. निरामिष वर्ज असल्याने, हिल्सा वगैरे मॉछेर झॉल काही चाखता आला नाही. पण सर्व त-हेच्या मिश्ट्या खाउन त्याचे उट्टे काढले. मिश्टी दोई खावे तर कलकत्त्यालाच. आणि आपल्या इथे ’रसगुल्ले’ म्हणुन जे काही गुल्ले खपवले जातात ते original रोशोगुल्ल्याचे सावत्र चुलत चुलत चुलत नावडते नातेवाइक आहेत हे जाणकारांनी जाणुन घ्यावे.
असं हे कोलकाटा गेल्या शतकातल्या वाटणा-या पिवळ्या धमक टॅक्स्यांचं, पुण्यापेक्षा बेकार ट्रॅफिकचं,"चोलबे ना" मिचिलांचं, जुन्या घरंदाज इमारतींचं, ट्रॅमच्या रुळांचं, गरिबी-श्रीमंतीच्या दरीचं, रोबिन्द्र शोंगिताचं, ऑमार शोनार गाच्छ!

No comments:

| Designed by Colorlib