`कोण आहे' ला उत्तर नाही.
दुसरीला जाग येते. उरलेल्या दोघांना पत्ता नाही. परत दार वाजवल्याचा आवाज.
`कोण आहॆ?' ... शांतता..
उठुन खिडकीतुन डोकावुन बघितले तर बाहेर कुणीच नाही. नुसती रातकिड्यांची कीरकीर.
दुस-या दिवशी शेजारच्या खोलीत झोपलेल्या आजी सांगतात की त्या रात्री उठल्या तर त्यांच्या खोलीचा दरवाजा सताड उघडा. झोपायला जाताना तर बंद केला होता.
प्रकरणाचा उलगडा होईना. ड्रायवरने फोडणी दिली, `रात्री मला पण कोणीतरी बाहेर असल्याचा भास झाला. गाडीत झोपलॊ होतो तर मागुन कोणीतरी येतंय. चेपलो जतोय असं वाटलं. मी टरकलो. म्हटलं 'मरु दे' चादर डोक्यावरुन घेउन झोपुन गेलो' (कोण मरु दे? हा का भूत? कोणास ठाउक?)
चौघांना एकाच रात्रीत आलेले अनुभव. बाकीच्यांना काहीच कल्पना नाही. काय घडले असेल याचा बराच खल झाला. पण सर्वांना समाधानकारक वाटेल असे स्पष्टीकरण मिळेना. मग तिथुन संभाषण इतर किस्स्यांकडे वळले.
कोकणात प्रत्येक घरच्या अश्या अद्भुत कथा असतात. पु.ल. म्हणतात तसा देवाआधी देवाचराला नमस्कार घडतो. आम्हाला आमची कथा मिळाली.
No comments:
Post a Comment